Tuesday, June 27, 2006

श्रावणमास

बरेच दिवस झालेत आता पाऊस सुरू होऊन. पण मी जीच्या शोधात आहे अशी पावसाळी कविता अजून सापडली नाही.
खरतर कविता स्वतःच कराविशी वाटली, पण पावसाळी कामांच्या गर्दीत राहुनच गेलं. तशी मी आठवीत असताना केली होती एक.. तिच्यासाठी स्पर्धादेखील जिंकलो होतो. पण आता ती कुठे असेल कोणास ठाउक.. माझी प्रिय पहिली कविता ;-)
अजून श्रावण सुरू झाला नसला तरीही हजेरी लावलेल्या इंद्रधनूस पाहून श्रावणमास आठवली. बालकवींची ही कविता मला आधीपासूनच आवडते, पण पूर्ण कविता आज पहिल्यांदाच एका संकेेतस्थळावर सापडली म्हणून वाचता आली.. तशी ती आईला पूर्ण पाठ आहे.. तरीही संग्रही ठेवतो.

श्रावणमास

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणांत येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.

वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे !

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! ती उघडे
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळेपिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा;
सर्व नभावर होय रेखिले सुंदरेतेचे रूप महा.

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनी भिजले अपुले पंख पांखरे सावरिती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारेही चरती रानी, गोपहि गाणी गात फिरे.
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे

सुवर्णचम्पक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला;
पारिजातही बघता भामारोष मनीचा मावळला!

सुंदर परडी घेउनि हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले-पत्री खुडती,

देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयांत,
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत!


..बालकवी.

Monday, June 26, 2006

न पाहिलेला मित्र

कधीकधी उगीचच कुणाचीतरी कमरता जाणवते.
त्या नसलेल्या, न भेटलेल्या किंवा कदाचित भेटून दूर गेलेल्या
माझ्या मित्रासाठी या चार ओळी..

असा कोण हा मित्र माझा,
ज्याची हुरहुर लागलीय क्षणोक्षण
न पाहिलेला स्वप्नसखा
त्याचा विरह भोगतोय मनोमन.

..राहुल.

चिंब भिजलेली रात्र

चिंब भिजलेली एक रात्र
अजुनही निजली नाही
तुझ्या आठवणींची एक सर
अजूनही सरली नाही

किती वारे आले अन् गेले कितीतरी
तुझ्या श्वासाने दरवळलेली एक झुळुक
अजूनही विरली नाही

शिंपडू देत मनसोक्त आज मला
माझीच आसवे
तुझ्या विरहाची अग्नी
अजूनही शमली नाही

..राहुल.

Friday, June 23, 2006

काम

Sometime back today, these words just slept out of my tounge:

काम तो बेहती नदीसा होता है,
खत्म भी हो तो सागरसा होता है

..राहुल.

न सुचलेली कविता

खूप प्रयत्न करून पाहिला,
पण कविता काही सुचली नाही.
तत्वांची असो वा सत्वांची,
शब्दांची सीमा अजूनही रूचली नाही.

..राहुल.