Thursday, August 10, 2006

प्रकाशधारा

जेमतेम ४ वर्षांपूर्वी सुचलेली ही कविता. कदाचित तेव्हा मी इंजिनिअरिंगच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षात असेल.

प्रकाशधारा


चला वर्षवू प्रकाशधारा, तिमिरांच्या जगती।
चला फैलवू स्नेहसुगंधा, दुरितांच्या जगती।।

याच दलदलीतुनी उगवतील
पंकज ज्ञानाचे
याच गलबलीतुनी झेपवतिल
पक्षी स्वातंत्र्याचे

समतल, उज्वल, उदात्त धेय्य तव
पर्वतही झुकती ।।१।।
चला वर्षवू...

कोटि-कोटि कर किरणांसम तव
अवगत प्रज्ञाने
उजळुनी टाकी सुवर्णापरी
उजाड उद्याने

आकांक्षेने आज उद्याची
इतिहासे घडती ।।२।।
चला वर्षवू...

आज जागवू धम्मसविता
विश्वबंधुतेने
आज जोडुया मने मनांशी
मातीच्या धाग्याने

अवखळ वाटा मार्ग सोडिती
मानवा पुढती ।।३।।
चला वर्षवू...

..राहुल.

No comments: