Monday, August 14, 2006

सागरी-सांज

या कवितेत, गीत म्हटलं अधिक योग्य वाटेल, ...तर या गीतात सर्वाधिक योगदान कुणाचं असेल तर ते म्हणजे 'सागर विहार ' या माझ्या नेहमीच्या 'सी शोर' चे. नाहीतर एरवी मी कुणाला 'सखी' म्हणावं इतकं मला कुणी आवडणं आणि मुळात मी कुणाला सागरी किनाऱ्यावर भेटण्याइतपत आवडणं म्हणजे पाहिले नसतानाही मागच्या किंवा पुढच्या एखाद्या जन्मावर विश्वास ठेवण्यासारखं. तेव्हा या माझ्या अंधश्रद्धांना दूर ठेवून फक्त हे गीत तेवढे एन्जॉय करा. मी कॉलेजात दवडलेल्या काही क्षणांचे हे फळ. आणि हो तुम्हालाही वेळ वायाच घालवायचा असेल तर एखादी टिप्पणी वा कमेंट काय म्हणतात.. तेपण मारून टाका.


साद देती सखे गं या सागरी लहरी
येशील सांजवेळी या सागरी किनारी ।।धृ।।

येती किती तरी गं या सागरा उभारे
केस कुरवाळताना उठती किती शहारे
बोल छपवू नको गं ओठांच्या तिजोरी ।।
......येशील सांजवेळी

क्षितिजावरी अभाळ धरेवरी झुकले
प्रेम या सागराचे किनारी धडकले
भेटीस साक्ष देईल चांदणे रुपेरी ।।
......येशील सांजवेळी

रेंगाळला इथे गं हा रेशमी समीर
जात्या क्षणासवे होतोय जीव अधीर
आहे तुझ्याचसाठी हा श्वासही अखेरी ।।
......येशील सांजवेळी

..राहुल.

No comments: